7.3 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img
spot_img
spot_img

*_सावलीत भव्य कार्यकर्ता मेळावा व पक्ष प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न!_* सावलीत भाजपाचा उत्साह उसळला; महसूल मंत्री बावनकुळे यांचे प्रभावी भाषण तसेच माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची विशेष उपस्थिती… ता.सावली जि.चंद्रपुर (दि. ०१ नोव्हेंबर २०२५)

 

सावली येथील पंचायत समिती जवळ आज भारतीय जनता पक्षाच्यावतीने भव्य कार्यकर्ता मेळावा व पक्ष प्रवेश सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्यास जनतेचा, कार्यकर्त्यांचा आणि नव्याने पक्षात दाखल झालेल्या नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमास राज्याचे महसूल मंत्री मान. चंद्रशेखरजी बावनकुळे, माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते आणि चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बंटीभाऊ उर्फ किर्तीकुमार भांगडिया यांची विशेष उपस्थिती लाभली.

*“भाजपाच्या विकास कार्यावर जनतेचा ठाम विश्वास आहे” — महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे*

राज्याचे महसूल मंत्री मान. चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी आपल्या भाषणात सांगितले — “या परिसरात जनतेचा विश्वास भारतीय जनता पक्षावर दृढ आहे. राज्य व केंद्र शासनाच्या विकासकामामुळे आणि जनतेच्या हितासाठी चाललेल्या कार्यपद्धतीमुळे आज अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे, याचा मला अत्यंत आनंद आहे.”

त्यांनी पुढे काँग्रेसवर टीका करताना म्हटले — “काँग्रेसमध्ये काम करताना ‘हवे दावे चालते’, नेतृत्व एकमेकांना मान्य नाही, एकमेकांकडे पाहत नाहीत. काँग्रेसमध्ये मतभेद आणि कामावरून वाद आहेत. या क्षेत्राचे खासदार जनतेची दिशाभूल करून आरक्षण व संविधानाच्या नावाखाली खोट्या आश्वासनांनी मते मिळवली. मात्र, निवडून आल्यावर जनता सोडून दिली आहे. आज ते क्षेत्रात फिरत नाहीत, जनतेच्या कामांकडे दुर्लक्ष करत आहेत.”

पुढे बोलताना मान. बावनकुळे म्हणाले —“माजी खासदार डॉ. अशोकजी नेते हे मात्र नेहमी जनतेच्या संपर्कात राहून जनतेच्या अडी अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करतात. काँग्रेसवाल्यांनी ‘लाडकी बहीण योजना’ बंद करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र ही योजना सुरू राहीलच, असा माझा विश्वास आहे. निवडणुकीत महिलांना महिन्याला खटाखट रुपये देऊ असे खोट बोलून तसेच संविधान बदलवण्याचे खोटे आरोप काँग्रेस करत असली, तरी भाजप सत्तेत असूनही संविधान अबाधित आहे आणि राहील.”

या कार्यक्रमात भाजपात प्रवेश करणाऱ्या नागरिकांचे दुपट्टा टाकून स्वागत करण्यात आले.

*_“विजयाचा संकल्प करूया” — माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांचे आवाहन_*
या प्रसंगी माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी बोलताना म्हणाले “आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत विजयाचा संकल्प करून कामाला लागा. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोदिया हा धान्य उत्पादक पट्टा असून या भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे धान्य नष्ट झाले आहे. शासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी आम्ही केली आहे.”

ते पुढे म्हणाले — “महसूल विभागाने पट्ट्यांच्या प्रश्नांकडेही गांभीर्याने पाहावे. भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.”

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात भाजपा कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

यावेळी मंचावर प्रामुख्याने चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बंटीभाऊ (किर्तीकुमार) भांगडिया,गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे,माजी आमदार तथा पदवीधर मतदारसंघाचे प्रमुख सुधाकरजी कोहळे,गडचिरोली भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे,माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे,माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी,ओबीसी समाजाचे नेते डॉ. अशोकजी जिवतोडे,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूरचे अध्यक्ष रवीजी शिंदे,भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिलजी धानोरकर, माजी जि.प. उपाध्यक्ष कृष्णा भाऊ सहारे, या कार्यक्रमाचे आयोजक व स्वतः भाजपात प्रवेश करून अनेकांना पक्षात आणणारे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रोहितभाऊ बोम्मावार,राज्य परिषद सदस्य राजूभाऊ देवतळे,
लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे,जि.प. माजी बांधकाम सभापती संतोष तंगडपलीवार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अविनाश पाल,भाजपा तालुकाध्यक्ष किशोरभाऊ वाकुडकर,महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा वंदना शेंडे,जिल्हा महामंत्री गीता हिंगे, संजय गजपुरे, गणेश तर्वेकर तसेच आवेश पठाण, देवराव सा‌ मुदमवार, अर्जुन भाऊ भोयर, देविदास बानबले, नीलम सुरमवार, छाया चकबंडलवार, सतिश बोम्मावार, सचिन तंगडपलीवार, नितिन कारडे, आशिष कार्लेकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशासाठी कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा

या भव्य कार्यकर्ता मेळावा व पक्ष प्रवेश सोहळ्याच्या यशासाठी
भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नेतृत्वाने अपार परिश्रम घेतले. संपूर्ण सावली परिसरात भाजपाचा झेंडा फडकत, घोषणांनी दुमदुमला,
आणि जनतेच्या उत्साहाने या कार्यक्रमाला यशस्वीतेचा नवा उत्साह संचारला.

spot_img

Related Articles

- Advertisement -spot_img

Latest Articles

You cannot copy content of this page