सिरोंचा:-
दिवाळी सणानिमित्त *स्नेहादेवी राजे धर्मरावबाबा आत्राम बहुद्देशीय संस्था, अहेरी (जि. गडचिरोली)*यांच्या वतीने आणि *स्नेहाधर्म धर्मार्थ दवाखाना, सिरोंचा* यांच्या सहकार्याने भगवंतराव हायस्कुल, नरसिंहापल्ली येथे भव्यदिव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे मार्गदर्शन डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम* यांनी केले असून, मा. हर्षवर्धनराव धर्मरावबाबा आत्राम आणि डॉ. मितालीअक्का आत्राम* यांच्या पुढाकाराने हा आरोग्य उपक्रम पार पडला.
शिबिरात एकूण 232 रुग्णांची तपासणी करण्यात आली व त्यांना मोफत उपचार तसेच औषधांचे वाटप करण्यात आले.
शिबिरात रक्तदाब तपासणी, मधुमेह तपासणी, सामान्य वैद्यकीय तपासणी अशा सेवा देण्यात आल्या.
या उपक्रमाचा लाभ भगवंतराव हायस्कुलचे विद्यार्थी, शिक्षकवर्ग तसेच स्थानिक नागरिकांनी घेतला.
ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा मोफत उपलब्ध करून देत समाजसेवेचे उदाहरण स्नेहादेवी संस्थेने घालून दिले आहे.
आपला आरोग्य, आपली जबाबदारी — स्नेहाधर्म धर्मार्थ दवाखाना, सिरोंचा