अहेरी तालुक्यातील मौजा – सकीनगट्टा येथील अंगणवाडी सेविका हे अंगणवाडी केंद्रातील विद्यार्थांना आणि गरोदर मतांना खराब झालेला पोषण आहार देत असल्याबाबत ची निवेदन सकीनगट्टा गावातील नागरिकांनी *महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. राजे धर्मराव बाबा आत्राम* यांना निवेदन दिले होते.
त्यानंतर *आमदार डॉ. राजे धर्मराव बाबा आत्राम* यांनी अहेरीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि सबंधित सुपर वायझार यांना बोलवून म्हणाले की, सकीनगट्टा गावातील अंगणवाडी केंद्राचा पोषण आहाराचा पाहणी करून चौकशी करा, जर चौकशी दरम्यान पोषण आहार खराब झाले असेल तर त्वरीत संबंधित अंगणवाडी सेविका आणि जबाबदार असलेले इतरही अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सांगितले.
त्यामुळे *अहेरीचे बाल विकास अधिकारी – राहुल वरठे* यांनी सकीनगट्टा गावात जाऊन अंगणवाडी केंद्रातील पोषण आहाराची पाहणी केला असता, अंगणवाडी केंद्रातील – वाटाणा, तांदूळ, गहू, दाळ हे खराब होवून अळ्या पडलेला होते तसेच तेल, टिकत, मीठ हळद या पॅकीट चा सुद्धा मुदत बाह्य झालेले होते. तसेच सदर पोषण आहाराची पाहणी करतांना – *राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव तथा येरमनारचे माजी सरपंच येरमनार – बालाजी गावडे* यांनी सुद्धा उपस्थित होते.
यावेळी पोषण आहाराची पाहणी करतांना असे दिसुन आले की, सकीनगट्टा गावातील अंगणवाडी केंद्रातील पोषण आहार विद्यार्थ्यांना व गरोदर मतांना ना दिलामुळे सदर पोषण आहार खराब झाल्याचा दिसुन आला. यावेळी *अहेरीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी – राहुल वरठे* यांनी साकीनगट्टा गावातील नागरिकांना शब्द दिले की, मी याबाबत दोषींवर कारवाई करतो असे म्हणाले.
यावेळी सकीनगट्टा गावातील अंगणवाडी केंद्राचा पोषण आहाराची पाहणी करतांना – आरेंदा ग्रामपंचातचे सरपंच – वेंकटेश तलांडी, आरेंदाचे ग्राम पंचायत अधिकारी – दिवाकर झाडे, सकीनगट्टा गावातील पाटील – रैनु गावडे , सामाजिक कार्यकर्ता – वारलु तलांडी, बाबुराव तलांडी, राकेश तलांडी, बाजीराव आत्राम गावकरी – राजु गावडे, साधू कुळमेथे, अनिल गावडे, चुक्कू आत्राम, केये कुळमेथे, विजा कुळमेथे, सौ. रती तलांडी, देसो आत्राम, विजे गावडे, पोवरी कुळमेथे, नुली तलांडी सह मौजा – सकीनगट्टा गावातील महीला व पुरूष उपस्थित होते.





