*अहेरी:-* पदवीधर मतदार संघाची निवडणुक होऊ घातली आहे सोबतच स्थानिक स्वराज्यसंस्थेच्या निवडणुका सुध्दा आगामी काळात होणार आहेत.त्यामुळे पुर्ण ताकतीनीशी कामाला लागावे अशी सुचना माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी सर्व भाजप कार्यकर्त्यांना दिली. पदविधर मतदार संघावर नेहमीच भाजपचा पगडा राहीलेला आहे किंबहुना ती तर भाजपची बलस्थाने आहेत. मागील वेळेस काही छोट्या चुकांमुळे मोठे नुकसान झालेले होते. या खेपेस सर्व ताकतीनिशी कार्यकर्ते काम करतील अशी ग्वाही श्री सुधाकर कोहळेंना राजेसाहेबांनी दिली.
या प्रसंगी श्री सुधाकरजी कोहळे,भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री रमेशजी बारसागडे, माजी आमदार मा. देवरावजी होळी, जेष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतभाऊ वाघरे इत्यादी मातब्बर मंडळी ऊपस्थित होते.मार्गदर्शन करतांना जिल्हाध्यक्ष श्री रमेश बारसागडेंनी मित्र पक्षातील वल्गना करणार्या नेत्यांना चांगलेच फैलावर घेतले.