*अहेरी:-* दरवर्षी प्रमाणे यंदा देखील समस्त कार्यकर्त्यांकडून मोठ्या जल्लोषात माझं वाढदिवस साजरा करून शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यात आले. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मला जनसेवेसाठी अधिक बळ आणि ऊर्जा देणारे ठरेल असा विश्वास अहेरी इस्टेटचे राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी व्यक्त केला.
15 ऑक्टोबर या दिवशी राजेंचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अहेरी विधानसभेतील पाचही तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यात राजघराण्यातील सदस्य, राजेंचे पदाधिकारी व कार्यकर्ते,राजे धर्मराव शिक्षण मंडळातील कर्मचारी आदींचा समावेश होता.यावेळी *’राजे साहेब* असे लिहिलेले भला मोठा केक कापून राजेंना शुभेच्छा व आशीर्वाद देण्यात आला.
वाढदिवसाच्या दिवशी सकाळपासूनच अहेरी उपविभागातील पाचही तालुक्यात रुग्णांना फळ वाटप,गरीब-गरजूंना आर्थिक मदत तसेच शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचा वाढदिवस साजरा केला.त्यानंतर सायंकाळी समस्त कार्यकर्त्यांनी राणी रुख्मिनी महालात हजेरी लावली.यावेळी बाल,तरुण,महिला चाहत्यांची अफाट गर्दी होती. चाहत्यांची तर सेल्फी फोटो करीता चक्क रांग लागली होती.राजे साहेब यांचे दिवसेंदिवस चाहत्यांची संख्या अगणित वाढत असल्याचे दिसून येत आहे.
यावेळी अहेरी विधानसभा क्षेत्रातील अहेरी,मुलचेरा,एटापल्ली, सिरोंचा,भामरागड येथील नाविस/भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते,तसेच धर्मराव शिक्षण मंडळातील कर्मचारी,गावकरी,महिला वर्ग आणि तरुण वर्गाचा सहभाग मोठ्या प्रमाणात होते.