*आदिवासी समाजाच्या मूलभूत हक्कांबाबत शासनाच्या उदासीन भूमिकेविरोधात व न्याय, हक्क आणि सन्मानाच्या मागण्यांसाठी “आदिवासी जन आक्रोश मोर्चा” आयोजित करण्यात आला होता.*
या मोर्चाचे आयोजन विविध आदिवासी संघटना, कार्यकर्ते आणि समाजबांधव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून, हा मोर्चा आदिवासी जनतेच्या वाढत्या समस्या, शासकीय योजनांतील अन्याय, वनहक्क कायद्याच्या अपुर्या अंमलबजावणी, शिक्षण व रोजगाराच्या संधींचा अभाव, तसेच आदिवासी संस्कृतीवरील वाढत्या आघातांविरोधात तीव्र निषेध नोंदविण्यासाठी आयोजित केला.
मुख्य मागण्या :
बंजारा धनगर आणि इतर समाज आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करू नये.
वनहक्क कायद्याची तात्काळ आणि पूर्ण अंमलबजावणी करण्यात यावी.
आदिवासी जमिनीवरील कब्जे थांबवून पारंपरिक हक्क मान्य करावेत.
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि शिष्यवृत्ती योजना प्रभावीपणे राबवाव्यात.
या मोर्चाद्वारे आदिवासी समाजाचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्यात आला. शासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा पुढील काळात व्यापक आंदोलन छेडले जाईल.
यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि 20 हजाराहून अधिक समाजबांधव उपस्थित होते.