मेडपल्ली येथील गोटुल भवनात ग्रामसभाच्या आराखडा संदर्भात विचारमंथन व चर्चेचे आयोजन.
अहेरी(गडचिरोली):- सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती ग्रामसभा मेडपल्ली अंतर्गत ज्या ग्रामसभाच्या आराखडा सादर झाले त्याचा विचारमंथन व चर्चा करण्यासाठी गोटूल भवन मेडपल्ली येथे आयोजित करण्यात आले.
यावेळी एकल सेंटरचे मुख्य मार्गदर्शन म्हणून मा. रमेश गावडे होते. त्यांनी मोलाची मार्गदर्शन करत पेसा कायदा, वनहक्क कायदा, गौण खनिज कायदा, तेंदू पत्ता, व इतर बाबतीत मोलाची मार्गदर्शन केले.
तसेच मा.अरुण चालुलकर एकल सेंटर सहयोगी मित्र यांनी सुद्धा समिती चे कार्य व अंमलबजावणी, मनरेगा कायदा, जंगलाचे व्यवस्थापन बाबतीत मार्गदर्शन केले.
यावेळी ग्रामसभा मेडपल्ली , ग्रामसभा चंद्रा म. ग्रामसभा अलदांडी, ग्रामसभा चंद्रा स.,ग्रामसभा येरमानार, ग्रामसभा गुर्जा बु. ग्रामसभा वेडमपल्ली व इतर ग्रामसभातील सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमला यशस्वीतेसाठी गावातील तरुण- तरुणी व महिला पुरुष यांनी मोलाची सहकार्य केले.