मचाडो यांनी हा सन्मान स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या व्हेनेझुएलाच्या लोकांना आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना समर्पित केला.
“मी हा पुरस्कार व्हेनेझुएलाच्या पीडित लोकांना आणि आमच्या मुद्द्यांना पाठिंबा देण्यासाठी निर्णायक भूमिका बजावणारे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना समर्पित करते,” असे मारिया यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केले .
नोबेल समितीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार “जास्त होत चाललेल्या अंधारात लोकशाहीची ज्योत तेवत ठेवणाऱ्या महिलेला” देण्यात येत आहे.
निवेदनात म्हटले आहे की नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मारिया कोरिना मचाडो या अलिकडच्या काळात लॅटिन अमेरिकेतील धैर्याचे सर्वात ‘असाधारण’ उदाहरण आहेत.
मारियाच्या नोबेल पुरस्काराने अनेक अटकळांना उधाण आले आहे. मारिया ट्रम्पची चाहती आहे आणि इस्रायलची ती जोरदार समर्थक आहे. इस्रायलच्या समर्थनार्थ तिच्या जुन्या ट्विट्सचीही मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
कोडपिंक येथील लॅटिन अमेरिका मोहिमेच्या समन्वयक मिशेल एलनर यांनी कॉमन ड्रीम्समध्ये लिहिले आहे की, “मी व्हेनेझुएलाची अमेरिकन नागरिक आहे आणि मला मारिया काय करते हे माहित आहे. खरं तर, मारिया ही इतर देशांमध्ये सरकारे बदलणाऱ्या अमेरिकन यंत्रणेची समर्थक आहे. ती निर्बंध, खाजगीकरण आणि परदेशी हस्तक्षेपाच्या लोकशाहीची प्रवक्ती राहिली आहे.”