-2.6 C
New York
Tuesday, February 3, 2026

Buy now

spot_img
spot_img
spot_img
spot_img

काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांचा कट्टर कार्यकर्त्याचा भाजपात प्रवेश. 

काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांचा कट्टर कार्यकर्त्याचा भाजपात प्रवेश. 

अहेरी:- तालुक्यातील पेरमिली येथे राजे फौंडेशन पेरमिली द्वारा पाठीराखा या नाट्यप्रयोगाचे 2 फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात होते. या नाट्यप्रयोगाचा उद्घाटन माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या शुभ हस्ते पार पडला तसेच यावेळी त्यांनी उपस्थित नाट्यरसिकांना संबोधित केले.

यावेळी काँग्रेसचे अजय ककडालवार यांचे पेरमिली चे कट्टर कार्यकर्ते आसिफ खान पठाण यांचा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देत सत्कार करण्यात आला. त्यानंतर भाजपात प्रवेश केल्याचे जाहीर करण्यात आले.

यावेळी मंचावर युवानेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम, संजय सडमेक (शेंडिया गाव इलाका पट्टी ), संदीप गावडे सामाजिक कार्यकर्ता, विनायक गावडे, महारू गावडे, डॉ. कुकुडकर  वैद्यकीय अधिकारी पेरमिली, राजू बोमनवार, शिवाभाऊ गर्गम, अभिजित शेंडे जिल्हा सचिव, मल्लेश तोटावार तालुका उपाध्यक्ष, सफराज आलम व आदी बहुसंख्येने गावकरी नाट्यरसिक उपस्थित होते.

spot_img

Related Articles

- Advertisement -spot_img

Latest Articles

You cannot copy content of this page